Advertisement

पुरूषांचे 'बाबा' होण्याचे योग्य वय काय असावे ?

पुरूषाचे वयही सुदृढ अपत्यप्राप्तीमध्ये महत्वाचे असते का?

आईपण हे स्त्रीशी प्रामुख्याने जोडलेले असते. त्यामुळे आई होण्याचा निर्णय स्त्रीने नेमका कोणत्या टप्प्यावर घ्यावा याबाबत अनेकदा सल्ला दिला जातो. मात्र स्त्रीप्रमाणेच पुरूषाचे वयदेखील 'बाबा' होण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते. Fertility and Sterility Journal, च्या अहवालानुसार, जर तुमच्या पुरूष साथीदाराचे वय 40 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर पंचविशीतील वयातील पुरूषांपेक्षा गर्भ धारणेचे प्रयत्न पाचपट अधिक लागतात. त्यामुळे अपत्यप्राप्तीसाठी नेमके पुरूषांनी कधी प्रयत्न कधी करावेत याबाबतचा सल्ला मॅक्स हॉस्पिटल्सच्या आयविएफ तज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. श्वेता गोस्वामी यांनी दिला आहे. आई होण्याचा निर्णय वयाच्या कोणत्या टप्प्यावर घेणं अधिक योग्य आहे ?

पुरूषांनी वयाची तिशी उलटली की दर वर्षी त्यांच्यामधील testosterone ची पातळी 1% ने कमी होते. Testosterone हे हार्मोन पुरूषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती करण्यास मदत करतात. त्यामुळे स्त्रियांप्रमाणेच पुरूषांनीही वाढत्या वयाकडे लक्ष देणं गरजेचे आहे. वयाच्या पस्तीशीनंतर  शुक्राणूंचा दर्जादेखील खालावतो. वाढत्या वयानुसार शुक्राणूंची मोबिलिटीदेखील कमजोर होते. पंचविशीपर्यत शुक्राणूंचा दर्जा आणि मोबिलिटी सर्वोत्तम दर्जाची असते तर 55 नंतर ही अत्यंत कमजोर होते. पन्नाशी पलिकडे शुक्राणूंची मोबलिटी ही सुमारे 54% नी खालावते. या '8' सवयींमुळे कमी झालेल्या शुक्राणूंच्या संख्येने वाढतो इन्फर्टिलीटीचा धोका !

सुदृढ बाळ जन्माला यावे याकरिता स्त्रीप्रमाणेच पुरूषही आवश्यक असतो. स्त्रीचे वय जसजसे वाढते तसे अंडाशयातून  निर्माण होणार्‍या अंड्यांचा दर्जाही खालावतो. त्याचप्रमाणे oestrogen या हार्मोनची पातळीही खालावते. त्यामुळे स्त्रीची फर्टीलिटी कमी होते. सोबतच बाळासाठी प्रयत्न केल्यास गर्भात काही जेनिटिक डिफेक्ट्स ( जन्मजात दोष) निर्माण होण्याची शक्यता असते. पुरूषाचे वय जसे वाढते तसे testosterone या हार्मोनची पातळी खालावते.त्याचा परिणाम शुक्राणूंच्या दर्जावर होतो. यामुळेही काही जेनिटिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात. या सहज सोप्या उपायाने वाढवा शुक्राणूची संख्या !

सुदृढ बाळाचा विचार करत असाल तर तो योग्य वयातच करणे आवश्यक आहे. सोबत धुम्रपान, मद्यपानासारख्या सवयींचा त्याग करा.उत्तम आणि संतुलित आहार, व्यायाम करण्याची सवय लावा. सोबतच गर्भधारणेसाठी फायदेशीर सेक्सपोजिशनचा आनंद घेत बाळासाठी करत असलेले प्रयत्न यशस्वी करा यशस्वी गर्भधारणेसाठी ’8′ हॉट सेक्स पोजिशन्स !! तुम्हांंला नक्कीच फायदेशीर ठरतील. पण मधुमेहामुळे पुरुषांची ‘बाबा’ होण्याची शक्यता कमी होते का ? हेदेखील जाणून घ्या.

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Total Wellness is now just a click away.

Follow us on