Advertisement

गरोदरपणात हेयर स्पा करणे सुरक्षित आहे का ?

हेयर स्पा किंवा कोणतीही नवीन ट्रीटमेंट करण्यापूर्वी हे जरुर वाचा.

गरोदरपणात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. या काळात केमिकल्सचा वापर बाळासाठी आणि मातेसाठी त्रासदायक ठरू शकतो. परंतु, अनेकदा ताण दूर करण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी हेयर स्पा सारख्या ट्रीटमेंटचा आधार घेतला जातो. पण गरोदरपणात या ट्रीटमेंटस करताना विशेष काळजी घ्या. त्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ Dr Amrita Sondhi यांच्या काही खास टिप्स:

१. पहिले तीन महिने वाट बघा: गरोदरपणाचे पहिले तीन महिने नाजूक असल्याने त्याकाळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही हेयर ट्रीटमेंट घेणार असाल तर तीन महिने वाट बघा. कारण या काळात बाळाचे स्नायू, अवयव आणि हेयर फॉलिकल्सची वाढ होत असते. त्यामुळे त्या काळात केमिकल्सशी संबंध टाळणे उत्तम ठरेल. ते बाळाच्या वाढीसाठी देखील अनुकूल ठरेल.

२. अमोनिया फ्री प्रॉडक्स वापरा: या काळात नैसर्गिक पदार्थ, प्रॉडक्स वापरणे योग्य ठरेल. शक्यतो अमोनिया फ्री प्रॉडक्सचा वापर करा. नैसर्गिक प्रॉडक्समुळे कोणताही त्रास होत नाही. आणि बाळासाठी देखील ते त्रासदायक ठरत नाहीत.

Also Read

More News

३. नैसर्गिक तेलांचा वापर करा: केमिकल हेयर स्पा ऐवजी केसांना नैसर्गिक तेल लावा. त्यामुळे केसांचे पोषण होईल आणि ताण देखील कमी होईल.

४. सलोनची स्वच्छता आणि वातावरण महत्त्वाचं: सलोनमध्ये जाण्यापूर्वी तेथील वातावरण आणि स्वच्छेतेबद्दल खात्री करूनच मग अपॉयमेन्ट बुक करा. कारण अस्वच्छेतेमुळे इन्फेकशन होऊ शकतं. तसंच केमिकल प्रॉडक्सच्या वासामुळे त्रास होऊ शकतो.

५. डॉक्टरांचा सल्ला घ्या: हेयर स्पा किंवा कोणतीही नवीन ट्रीटमेंट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Stay Tuned to TheHealthSite for the latest scoop updates

Join us on