होळी सणाला (Holi Festival) आपल्या देशात मोठ्या प्रमाणात भांगचं (Cannabis) सेवन केलं जात. नशा करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तुम्हाला कदाचित माहित नसेल संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) भांगला (Cannabis) धोकादायक म्हणजेच अंमली पदार्थांच्या यादीतून (dangerous drugs list) हटवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (World Health Organization) करण्यात आलेल्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी हा निर्णय घेतला होता. आयुर्वेदात भांगचे औषधी गुण सांगण्यात आले आहेत. भांग पिणे आरोग्यासाठी धोकादायक असले तरी आनंद साजरा करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो. चिंता आणि तणावमुक्तीसाठी देखील भांग सेवन केले जाते. भांगेच्या झाडाच्या पानांचा अर्क काढून त्याचे काही थेंब कानात टाकल्यानं डोकेदुखीपासून सुटका मिळवता येते. पचनशक्ती वाढवण्यासाठी