तुम्ही किती प्रमाणात जंक फूड खाता? सॉफ्ट ड्रिंक्स किंवा फ्राईज वर किती पैसे खर्च करता? स्वस्त पडतो म्हणून लहान पॉपकॉर्न टबऐवजी मोठा विकत घेता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुम्ही तुमच्या आरोग्याचे खूप नुकसान करत आहात. जर तुम्हाला आरोग्यदायी दीर्घ आयुष्य हवं असेल तर तुम्हाला पोर्शन साईजवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. न्यूट्रिशनिस्ट दिव्या सांगलीकर यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात कॅलरीज लागतात. कारण प्रत्येकाची गरज वेगळी असते. त्याचे प्रमाण वय लिंग वजन उंची कामाचे स्वरूप यावर अवलंबून असते. पोर्शन साईज नियंत्रित ठेवल्याने वजन आटोक्यात राहते आणि उत्तम आरोग्य लाभते. म्हणूनच पोर्शन साईज नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी काही उपाय व