Read this in English Translated By - Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य –Getty Images स्टार्टर्स त्यानंतर मेन कोर्स त्यापाठोपाठ गोडाचे पदार्थ असा अनेकांचा खाण्याचा क्रम असतो. जेवण झाल्यावर गोडाचे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो. विशेषतः सतत गोड खाण्याची इच्छा असणार्यांनी हा क्रम पाळणे कितपत फायदेशीर आहे या बाबत प्रसिद्ध आहारतज्ञ आणि ओबेसिटी कन्सलटंट नैनी सेतलवड यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. गोडाचा पदार्थ जेवणानंतर खाण्यासाठी राखून ठेवणे ही सवय चूकीची आहे. असे आहारतज्ञ नैनी यांचे मत आहे. त्यांच्यामते जेवणानंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण निश्चितच वाढते. सोबतच लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणार्या इतर शारिरीक समस्यादेखील वाढतात. आहारात डाळी कडधान्यांचा समावेश