हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बऱ्याचदा पनीर असलेल्या पदार्थांची ऑर्डर देतो. कारण पनीरचे सर्वच पदार्थ खूप चविष्ट असतात. मांस न खाणाऱ्या अनेक लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रोटिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. मग जरा विस्ताराने जाणून घ्या पनीरचे आरोग्यदायी फायदे प्रोटिनचा सर्वोत्तम स्रोत काही शाकाहारी लोक मांस खात नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी पनीर हा प्रोटिन्स मिळवण्याचा चांगला स्रोत आहे. 100 ग्रॅम पनीरमधून 18 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि वजन कमी होण्यासही मदत होते. भुकेवर नियंत्रण राहते पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच