वजन तर घटवायचय पण नेहमी तोच तोच व्यायामप्रकार करून तुम्हाला कंटाळा येतो ना ? मग व्यायामाचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी त्यात थोडं वैविध्य आणणेदेखील गरजेचे आहे. मग व्यायाम हा शिक्षेप्रमाणे वाटण्याआधीच त्यात हे 8 बदल नक्की कराच .... व्यायाम की खेळ ? तुम्हाला काय करायला आवडेल अर्धा तास जिममध्ये व्यायाम करा किंवा मोकळ्या जागी बॅटमिंटन खेळा हे दोन पर्याय तुम्हाला दिले तर तुम्ही काय निवडाल ? आम्हाला ठाऊक आहे बरीच जणं बॅटमिंटनचाच पर्याय निवडतील. कारण खेळातून पुरेशी शारीरिक हालचाल होते. मग जिममध्ये जाऊन तो कंटाळवाणा व्यायाम करायची गरजच काय ? बॅटमिंटन खेळायला साथीदाराची गरज असते. मग एकट्याने व्यायाम करणार्या मित्र- मैत्रिणींचा