स्विमींग हा मुलांसाठी एक उत्तम व्यायाम प्रकार आहे.स्विमींग शिकल्यामुळे मुले केवळ पाण्यामध्ये पोहणे अथवा स्विमींगचे विविध प्रकार शिकतात असे नाही तर यामुळे तुमची मुले एक उत्तम स्पर्धात्मक तरणपटू देखील बनू शकतात.तज्ञांच्या मते जर १५ ते १८ महिने या वयातील मुलांकडून जर पाण्यात पोहण्याची पुर्वतयारी करुन घेतली तर वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत त्यांच्या पोहण्याच्या व स्ट्रोकच्या तंत्रामध्ये योग्य विकास करता येऊ शकतो.तसेच वाचा लहान मुलं स्विमींग करीत असताना काय सावधगिरी बाळगाल ? Team Speedo च्या माना पटेल देखील अशा मुलांपैकी एक आहेत.त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी स्विमींग शिकण्यास सुरुवात केली व वयाच्या पंधराव्या वर्षी त्या बॅकॉंक मधील एशियन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवणा-या पहिला