Sign In
  • मराठी

World Hepatitis Day: कावीळमधून बरे होण्यासाठी उपयुक्त ठरतील ही योगासने !

राग, ताण या नकारात्मक भावना दूर करण्यास आणि शरीरातील ऊर्जा वाढवण्यास योगसाधना फायदेशीर ठरते.

Written by Editorial Team |Published : July 28, 2017 1:11 PM IST

कोणत्याही आजारातून बरे होण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरीत्या कणखर व्हावे लागते. त्याचबरोबर आहारात देखील काही बदल करावे लागतात. कावीळ झाल्यानंतर अशक्तपणा येतो. अशावेळी शरीर जरी थकलेले, आजारी असेल तरी तुम्हाला मनाने खंबीर व्हावं लागतं. कारण मनाचा प्रभाव नक्कीच आपल्या शरीरावर पडतो. जेव्हा शरीर आजारी असतं तेव्हा मनावर परिणाम होतो आणि जेव्हा मन दुखी होतं तेव्हा शरीरातील उर्जेवर परिणाम होतो.

मन शांत आणि सकारात्मक ठेवण्याची सवय लागून घ्या. त्यासाठी तुम्ही ध्यान करू शकता. त्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती परत मिळवण्यास मदत होईल. कावीळ झाल्यानंतर चिंता, काळजी, ताण, राग, चिडचिड या सगळ्या नकारात्मक भावनांपासून लांब रहा. रागावर नियंत्रण मिळवण्यास उपयुक्त ठरतील या '५' योगमुद्रा !

योगसाधनेमुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास, शरीराला ऊर्जा मिळण्यास आणि नकारत्मक भावनांपासून दूर राहण्यास मदत होते. दिल्लीच्या आर्ट ऑफ लिव्हिंग योगा च्या रिजनल डिरेक्टर Gaurav Verma, यांनी कावीळमधून बाहेर पडण्यासाठी योगसाधना कशी फायदेशीर ठरते, ते सांगितले.

Also Read

More News

कावीळ झाल्यावर योगसाधनेतून तुम्ही शरीरातील कमी झालेली ऊर्जा परत मिळवू शकता. त्यासाठी योगासनं, प्राणायाम, धौती क्रिया यामुळे यकृतातून bile चे होणारे अतिरिक्त निर्मिती कमी होण्यास मदत होते. हे कावीळ होण्याचे प्राथमिक कारण आहे. या काही योगासने यकृताचे कार्य पूर्ववत करण्यास फायदेशीर ठरतील.

  • बद्ध पद्मासन: या आसनामुळे पोटातील अवयवांची विशेषतः यकृताची स्ट्रेंथ वाढण्यास मदत होते.
  • सर्वांगासन: या आसनामुळे यकृत, किडनी आणि श्वसनसंस्थेचे कार्य सुधारण्यास व त्यांची स्ट्रेंथ वाढण्यास मदत होते.
  • मत्स्यासन: या आसनामुळे डोक्याच्या दिशेने होणारा रक्तप्रवाह सुधारतो. त्याचबरोबर पोटातील अवयव टोन होतात आणि टॉक्सिन्स शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.
  • उज्जायी प्राणायाम: उज्जायी प्राणायामामुळे शरीर व मन शांत होते.
  • योगनिद्रा: शरीर-मन रिलॅक्स करण्यासाठी शवासन म्हणजेच योगनिद्रा करणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि शांत झोप येण्यास मदत होते.
  • वमन धौती: या क्रियेमध्ये भरपूर पाणी पिऊन तर्जनी आणि मधले बोट जिभेच्या टोकाशी लावून उलटी बाहेर काढावी. त्यामुळे पोटातील अतिरिक्त पित्त आणि गॅस बाहेर पडण्यास मदत होते.

कावीळसाठी आयुर्वेदीक ट्रीटमेंट घेतल्यास फक्त त्याची लक्षणे दूर न होता आजार मुळापासून दूर होतो. परंतु, आयुर्वेदीक ट्रीटमेंट घेताना खाण्याची काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. पचण्यास जाड असलेले पदार्थ म्हणजे तेलकट, तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड खाणे टाळावे. आयुर्वेदानुसार कावीळ झाल्यास हे '५' पदार्थ खाणे टाळा !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Total Wellness is now just a click away.

Follow us on