जर तुम्ही ब्लड थिनर्स घेत असाल तर इतर औषधोपचारांप्रमाणेच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला तंतोतंत पाळणे गरजेचे आहे.ब्लड थिनर्स घेणा-या लोकांना आहाराबाबत पथ्ये पाळावी लागत नाहीत.मात्र ब्लड थिनर्स सुरु करताना तुम्हाला इतर आरोग्य समस्यांवर औषधोपचार सुरु असतील तर त्यांची माहिती तुमच्या डॉक्टरांना आधीच देणे फार गरजेचे आहे.कारण अगदी सर्दी-तापावरच्या औषधांपासून ह्रदयविकार व क्षयरोगावरची औषधे देखील ब्लड थिनर्सची कार्यक्षमता बदलू शकतात.तसेच वाचा ब्लड थिनर्सच्या गोळ्या घेणं विसरणं केव्हा ठरतं सर्वाधिक धोकादायक ? यासाठी एशियन हार्ट इन्स्टिट्युटचे Cardiac Electro Physiologist डॉ.संतोष कुमार डोरा यांच्याकडून जाणून घेऊयात कोणत्याही आरोग्य समस्येवर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे का आवश्यक आहे. डॉ.डोरा यांच्यामते औषधे विशेषत: ब्लड थिनर्स विचारपूर्वक देण्यात