पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताना आजकाल हाताने जेवण्याऐवजी चमचे किंवा फोकने जेवण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमध्ये हातानेच जेवण्याची प्रथा आहे. हाताने जेवण्यामागे काही आरोग्यदायी संकेतही आहेत. म्हणूनच तुम्हांला दीर्घायुषी करणाऱ्या या संकेतांमागील ही चार कारणं जरूर जाणून घ्या. पंचतत्त्वांचे प्रमाण राखते : मानवी शरीर हे पंचतत्त्वांनी बनले आहे. प्रत्येक बोटाच्या अग्रभागी एका तत्वाचे अस्तित्व असते असे आयुर्वेद सांगते. अंगठा - अग्नी पहिले बोट (तर्जनी) - वायूचे प्रमाण राखते मधले बोट - आकाश अनामिका - पृथ्वी करंगळी - पाणी या पंचतत्त्वांमध्ये असमतोल निर्माण झाल्यास आजार जडण्यास सुरवात होते. हाताने जेवताने सारी बोटे एकत्र जवळ येतात. यामुळे तयार होणार्या