हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आहारात करा या खाद्यतेलांचा समावेश

By Editorial Team | Updated:Wed, April 19, 2017 12:28am

केवळ टिव्हीवरच्या जाहिराती पाहून खाद्य तेलांची निवड करू नका ! म्हणूनच हेल्दी तेलाच्या निवडीसाठी घ्या हा एक्सपर्ट सल्ला

स्वयंपाकात पदार्थ तळण्यासाठी,फोडणीसाठी अथवा सलाड ड्रेसिंगसाठी खाद्यतेलाचा वापर करण्यात येतो.मात्र स्वयंंपाकात वापरण्यात येणा-या तेलांबाबत आज अनेक गैरसमज आहेत.स्वयंपाकात खाद्यतेलाचा वापर आरोग्यासाठी हितकारक नाही हा त्यापैकीच एक गैरसमज आहे.विशेषत: तेला मध्ये अधिक प्रमाणात फॅट्स असल्यामुळे ह्रदयाच्या आरोग्यासाठी तेलाचा वापर टाळावा असेच सर्वत्र सांगण्यात येते.मात्र स्वयंपाकात तेलाचा वापर न करणे हे आरोग्यासाठी योग्य नाही.कारण ह्रदय निरोगी ठेवण्यासोबत शरीरातील विविध कार्य उत्तम करण्यासाठी तेला मधील फॅट्स अत्यंत उपयुक्त असतात.यासाठी योग्य तेलाचाच वापर करणे गरजेचे आहे.

मुंबईतील स्पोर्ट न्यूट्रीशनिस्ट आणि डायटीशियन दीपशिखा अग्रवाल ह्रदयविकार असलेल्या रुग्णांना ऑलिव्ह ऑईल,सनफ्लॉवर ऑईल आणि राईस ब्रान ऑईलचा वापर स्वयंपाकात करण्याचा सल्ला देतात.कारण या तेलातील अनसॅच्युरेटेड फॅट्स,पोषकमुल्ये व काही सक्रिय घटकांचा ह्रदयाच्या संरक्षणावर चांगला प्रभाव पडतो.

म्हणूनच हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी या हेल्दी तेलांचा आहारात नक्की विचार करा - 

१. ऑलिव्ह ऑईल-

ऑलिव्ह ऑईल हे ताज्या ऑलिव्ह या फळापासून तयार केलेले शुद्ध वेजिटेबल तेल अाहे.यामध्ये सामान्यत: एक्स्ट्रा व्हर्जिन,व्हर्जिन,प्यूअर व एक्स्ट्रा लाईट असे चार  प्रकार असतात.या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण कमी असते.यात सॅच्युरेटेड फॅट्स १३ टक्के,मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स ७२ टक्के तर पोली अनसॅच्युरेटेड फॅट्स ८ टक्के या प्रमाणात आढळतात.यातील पोनीफिनोल्स(Polyphenols),अॅन्टी-इनफ्लेम्टरी कपांऊंड्स Anti-inflammatory compounds आणि अॅन्टीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात जे तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितकारक अाहेत.हे तेल वापरणे फक्त एकाच गोष्टींमुळे अडचणीचे असू शकते ते म्हणजे ते कमी तापत असल्यामुळे त्याचा अन्नपदार्थ शिजवण्यापेक्षा सलाड ड्रेसिंगसाठी अथवा डीपस् साठी अधिक वापर करण्यात येतो.

२. सनफ्लॉवर ऑईल-

सनफ्लॉवर ऑईल ह्रदयासाठी हितकारक असले तरी याचा स्वयंपाकात जास्त वापर करण्यात येत नाही.या तेलात अधिक प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड,ओमेगा ६ फॅटी अॅसिड व  विटामिन ई असतात.ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते व ह्रदयाचे कार्य सुधारते.यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स देखील कमी प्रमाणात असल्याने हे तेल ह्दयविकार असणा-यांसाठी अतिशय उत्तम असे तेल अाहे. जाणून घ्या नियमित आहारात किती चमचे तेल वापरावे ?

३. राईस ब्रान ऑईल-

राईस ब्रान ऑईल हे अनेक पोषक घटक असलेले व ह्दयासाठी अत्यंत उपयुक्त असे वेजिटेबल ऑईल आहे.या तेलातील Gamma Oryanol या घटकामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी राहते. हे तेल चांगले  तापत असल्यामुळे या तेलाचा तळण्यासाठी व स्वयंपाकासाठी देखील वापर करता येतो.

ह्रदय रोगी निरोगी जीवनशैलीसाठी यापैकी कोणत्याही तेलाचा स्वयंपाकात वापर करु शकतात.ऑलिव्ह ऑईल हे थोडे महाग असले तरी तुम्ही सनफ्लॉवर आईल व राईस ब्रान ऑईलचा वापर आहारात जरुर करु शकता. हे नक्की वाचा व्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचे आरोग्य

ह्रदयविकार असणा-यांनी कोणते खाद्यतेल खाणे टाळावे?

दीपशिखा अग्रवाल यांच्या मते ह्रदयरोगींनी शेंगदाणा तेल,नारळाचे तेल खाणे टाळावे कारण त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचा स्वयंपाकात दररोज वापर केल्यास ह्रदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.पर्यायी उपाय म्हणून तुम्ही अनेक तेलांचा एकत्र वापर केला तर ते देखील तुमच्या फायद्याचे ठरु शकते.मात्र लक्षात ठेवा ह्रदयविकार असणा-यांनी नेहमी योग्य तेलाचा वापर करणे हेच तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे.

Read this in English

Translated By – Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Published:Wed, December 14, 2016 1:35am | Updated:Wed, April 19, 2017 12:28am

Tags

Health tips in Marathi

Explore more