Advertisement

ताप आल्यानंतर कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?

आपल्या मनात असलेल्या शंकेचे डॉ. श्रीवास्तव यांनी निरसन केले.

अंग तापल्यासारखे वाटल्यास किंवा ताप आल्यास तुम्ही काय करता?

. त्याकडे फारसे लक्ष न देता आपल्या कामाला लागता.

. एक दिवस सुट्टी घेता आणि आराम करता. मग तुम्हाला वाटते की दिवसभरात तुम्ही ठीक व्हाल.

Also Read

More News

३. कोणतातरी घरगुती उपाय करून बघता किंवा गूगलवर नैसर्गिक उपाय शोधता.

. फक्त तापासारखं वाटतंय. एक पॅरासिटामॉल किंवा क्रोसिन घेऊन बरे वाटेल. त्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही.  ताप वाढण्यामागील ही ’10′ कारणं तुम्हांला ठाऊक आहेत का ?

. हे सगळे केल्यानंतर जेव्हा तुमचा ताप १-२ दिवसानंतर देखील जात नाही. आणि तुमचं अंग अधिक दुखू लागत किंवा इतर लक्षणे जाणवू लागतात, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता.

परंतु, ताप आल्यानंतर इतर काही करण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाणे योग्य ठरेल. ताप वाढल्यानंतर २-३ दिवसांनी डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मुंबईचे Infectious disease आणि Immunology चे कंसल्टंट डॉ. ओम श्रीवास्तव यांनी योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्याविषयी माहीती दिली.

ताप कमी होण्याची वाट बघण्यापेक्षा पहिल्याच दिवशी डॉक्टरकडे जावे, असा सल्ला डॉ. श्रीवास्तव देतात. कारण ताप येणे हा इन्फेकशनचा संकेत आहे. त्यामुळे त्याचे कारण लवकरात लवकर कळणे आणि त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे. कारण बरेच लोक ताप आल्यावर पहिल्या दिवशी डॉक्टरकडे न जाता ताप उतरण्याची वाट बघत बसतात. परंतु, असे होत नाही कारण जोपर्यंत तापाचे कारण कळत नाही, त्यावर उपचार होत नाही तोपर्यंत ताप उतरणार नाही. ताप उतरण्यासाठी तुम्ही जर पॅरासिटामॉल घेण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका. कारण ते योग्य नाही. त्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या, गरजेच्या टेस्ट करून घ्या आणि त्यावर औषधे घ्या. ताप गेल्यानंतर औषधे घेणे बंद करावे का ?

परंतु, लहान बाळाला ताप आल्यास म्हणजे ते इन्फेकशन किंवा व्हायरल फिव्हर काहीही असल्यास पॅरासिटामॉल देणे काही वेळापर्यंत ठीक आहे. पण सुरक्षिततेसाठी बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे देणे योग्य ठरेल. ताप, दातदुखी, डोकेदुखीच्या समस्यांमध्ये कधी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला ?

म्हणून, तापाचे कारण काहीही असो, त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्यावर वेळीच उपचार करा. viral fever चा ताप किती दिवसात ठीक होतो ?

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Total Wellness is now just a click away.

Follow us on