व्यायामानंतर अंघोळ करणे हे शरीराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण व्यायाम करताना आलेला घाम हे जरी चांगले लक्षण असले तरी तो वेळीच स्वच्छ होणे देखील महत्त्वाचे आहे. पण अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड याबद्दल मनात शंका असेल तर V’s Fitness च्या फिटनेस एक्स्पर्ट रोशनी शहा यांनी ही शंका दूर करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल तर व्यायामानंतर थंड पाण्याने अंघोळ करा. कठीण व्यायामानंतर म्हणजेच delayed onset muscle soreness (DOMS)मुळे स्नायू दुखत असतील तर बर्फासारख्या थंड पाण्याने अंघोळ करा. विशेषतः जो स्नायू दुःखात असेल तो थंड पाण्याने शेकवा. थंड पाण्यात अंघोळ करताना शरीराचे तापमान योग्य