तळलेल्या पदार्थांमधील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर कराल तर वाढेल या गंभीर आजाराचा धोका

By Editorial Team | Updated:Tue, April 18, 2017 7:17pm

चकली, समोसे,भजी तळल्यानंतर वर्तमानपत्रावर मूळीच टाकू नका.

नवरात्रीची धूम संपली की घराघरात दिवाळीचे वेध लागतात. दिवाळ सणापूर्वी घराची झाडलोट केली जाते. कीडे-कीटकांपासून बचाव करण्यासाठी काही हर्बल पेस्टकंट्रोलच्या मदतीने साफासफाई केली जाते. मात्र या नंतर दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते तो म्हणजे दिवाळीचा फराळ. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे असे अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळणीचे असल्याने आणि मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने तेलातून काढल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर पसरले जातात. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो. मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

मासिकं किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. त्यामधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही बळावतो. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतू ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. असा सल्ला डाएटीशन आणि स्पोर्ट न्युट्रीशिएनिस्ट दीपशिखा अग्रवाल देतात. वर्तमानपत्राच्या कागदामधील, शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करण्यास तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरातात. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणूनच तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर निथळत ठेवणे किंवा गुंडाळण्यासोबतच ही '5' पॅकेजिंग प्रोडक्ट्सदेखील वापरणे टाळा.

वर्तमानपत्राच्या शाईमध्ये पेट्रोलियम बेस्ड मिनरल ऑईलचा वापर करून ती अधिक पातळ केली जाते. तर ती सुकवण्यासाठी कोबाल्ट बेस्ड घटकाचा वापर केला जातो. हे दोन्ही घटक आरोग्याला त्रासदायक असतात. वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा. फराळावर ताव मारण्याआधी लक्ष द्या त्यातून मिळाणार्‍या कॅलरी काऊंटवर !

टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा. पण वर्तमानपत्र वापरणे कटाक्षाने टाळण्याचा सल्ला दीपशिखा यांनी दिला आहे. (नक्की वाचा : चमचाभर तेलात बनवा हेल्दी आणि टेस्टी बेक्ड चकली’)

Read this in English

Translated By – Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Published:Wed, October 12, 2016 4:00pm | Updated:Tue, April 18, 2017 7:17pm

Tags

Health tips in Marathi Cancer in Marathi

Explore more