Sign In
  • मराठी

पावसाळ्यात मधूमेहींनी या '7' गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी !

मधूमेहींनी वर्षभर स्वत:ची योग्य काळजी घेणे तर गरजेचे आहेत.पण त्यासोबत जाणून घ्या पावसाळ्यामध्ये त्यांनी कोणत्या दक्षता पाळाव्यात.

Written by Editorial Team |Updated : July 17, 2017 12:07 PM IST

मधूमेहींनी पावसाळ्यामध्ये आरोग्याबाबत जास्त दक्षता पाळणे गरजेचे आहे.पायांना इनफेक्शन व त्यामुळे होणा-या दुखापती टाळण्यासाठी मधूमेंहींनी पाय जास्त ओले रहाणार नाहीत याची काळजी घ्या.एका आकडेवारीनूसार भारतात सुमारे ६२ दशलक्ष मधूमेही आहेत.पण मधूमेहाविषयी आजही पुरेशी जनजागृती नसल्यामुळे या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.खरंतर मधूमेंहींनी त्यांच्या आरोग्याची  काळजी घेणे आवश्यक आहे.दीर्घकालीन आरामासाठी अशा रुग्णांनी पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी.कारण पावसाळ्यामधील आर्द्रता,घाम व ओलावा बुरशी व सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी पोषक असतो.तसेच जाणून घ्या मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय

यासाठीच मधूमेंहीनी पावसाळ्यामध्ये विशेष काळजी घ्यावी.तसेच योग्य आहार घ्यावा व वैयक्तिक स्वच्छता पाळावी.मधूमेहामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे या काळात इतर समस्या टाळण्यासाठी मधूमेहाला नियंत्रित ठेवावे.

कर्नाल येथील भारती हॉस्पिटलचे Consultant Endocrinologist व  South Asian Federation of Endocrine Societies चे वाईस प्रेसिडंट डॉ.संजय कालरा यांच्यामते पावसाळा सुरु झाल्यामुळे वातावरण उष्ण व दमट होते.या काळात रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे मधूमेहींना श्वसन समस्या निर्माण होऊ शकतात.पावसात भिजल्यास त्यांच्या शरीराला खाज सुटू शकते.तसेच मधूमेहींनी या काळात पायांची देखील विशेष काळजी घ्यावी.पावसामुळे फंगल इनफेक्शन झाल्यास त्याचे रुपांतर पुढे गॅंगरिन मध्ये होऊ शकते.वेळीच लक्ष न दिल्यास त्यामुळे पाऊल काढून टाकावे लागू शकते.थोडक्यात पावसाळ्यात मधूमेहींनी विशेष दक्षता पाळण्याची गरज असते.योग्य काळजी व आहारात पथ्य पाळून मधूमेही पावसाचा आनंद घेऊ शकतात.यासाठी जाणून घ्या मधूमेहींच्या आहाराबाबत असलेले ’6′ गैरसमज !

Also Read

More News

मधूमेहाचा संपूर्ण शरीरावर प्रभाव पडत असला तरी पायांवर त्याचा जास्त परिणाम होत असतो.त्यामुळे या काळात पायांची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे.अस्वच्छ व ओलसर पाय अनेक बुरशी व जिवाणूंना आमंत्रित करत असतात.जर पावसाळ्यामध्ये तुमच्या पायांना इनफेक्शन झाले तर पुढील धोका टाळण्यासाठी त्वरीत Podiatrist चा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करावेत.तसेचे वाचा प्री-डायबेटीसची लक्षणे,निदान,आहार व उपचार

यासाठी जाणून घ्या मधूमेहींनी पावसाळ्यामध्ये कोणती काळजी घ्यावी?

१.मधूमेहींनी फुड पॉयझनिंग,डायरिया व कॉलरा टाळण्यासाठी पावसाळ्यामध्ये बाहेरील अशुद्ध अन्नपदार्थ खाऊ नयेत.तसेच वेळेत व नियमित आहार घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाते.यासाठी त्यांनी घरी तयार केलेले व ताजे अन्न खा.तसेच जाणून घ्या ‘हळदी’ने कशी ठेवाल रक्तातील साखर नियंत्रणात !

२.भरपूर पाणी प्या.शितपेय व कॅफेनयुक्त पेय पिण्याऐवजी नारळपाणी प्या.रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सूप,आल्याचा चहा अशी गरम पेय घ्या.यासाठी वाचा पाया सूप केवळ चवीसाठी नव्हे तर या ’5′ आरोग्यदायी फायद्यांंसाठीही नक्की चाखा !

३.खाण्यापूर्वी भाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्या.बराच काळ घराबाहेर प्रवास करणार असाल तर काही खाण्याचे पदार्थ घरातूनच घेऊन जा.

४.पावसाळ्यामध्ये डोळ्यांचे इनफेक्शन होण्याची देखील शक्यता असते.आय इनफेक्शन टाण्यासाठी मधूमेंहींनी नियमित डोळ्यांची तपासणी करावी.यासाठी वाचा कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?

५.पावसात ओले झाल्यामुळे होणारे इनफेक्शन टाळण्यासाठी कपडे व चपलांचा जास्तीचा जोड सोबत ठेवा.कोरडे रहाण्यासाठी मोजे अथवा घट्ट बूट घालण्यापूर्वी पावलांवर टाल्कम पावडर लावा.वाचा पावसाळ्यात पायांचे आरोग्य जपा या ‘३’ एक्स्पर्ट टीप्सने !

६.फूटवेअर व मोजे भिजल्यास ते त्वरीत काढून पाऊले स्वच्छ व मऊ कापडाने पुसून घ्या.पायाचा अंगठा व बोटांमध्ये इनफेक्शन झालेले आहे का हे देखील नियमित तपासा.

७.पाय केवळ साबण व पाण्याने धुणे पुरेसे नाही.इनफेक्शन टाळण्यासाठी ते वेळेवर कोरडे करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.पायाची नखे नियमित कापा व स्वच्छता राखा.तसेच या टीप्सने मिळवा टाईप 2 डाएबिटीसवर नियंत्रण !

Read this in English

Translated by Trupti Paradkar

छाया चित्र सौजन्य : Shutterstock

Total Wellness is now just a click away.

Follow us on