तुम्हाला लघवी धरून ठेवायची सवय आहे का? कारण अनेकांना अशी सवय असते. कधी कधी लघवी आल्यावर आपण जाण्याचा कंटाळा करतो. किंवा कधी असे प्रसंग उद्भवतात की तेव्हा आपल्याला लघवी धरून ठेवावी लागते. अनेकदा तर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा पर्याय आपण विविध कारणांसाठी नाकारतो. पण लघवी धरून ठेवणे आरोग्यासाठी चांगले नाही. याबद्दल युरोलॉजिस्ट डॉ. पियाली चॅटर्जी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यामुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. जरूर वाचा: लघवी करताना त्रास का जाणवतो ? लघवी धरून ठेवणे हानिकारक असते का? लघवी धरून ठेवल्याने युरिनरी ट्रॅकचे इन्फेकशन होण्याची संभावना असते. युरिनरी ट्रॅक इन्फेकशन झाल्याने सारखे टॉयलेट जावे लागते. तसेच painful bladder syndrome आणि overactive bladder असे त्रास उद्भवतात. यावर