Advertisement

मासिकपाळीच्या काळात गॅस बाहेर का पडतो ?

मासिक पाळीतील हार्मोनल बदलांमुळे शरीरातून अधिक गॅस बाहेर पडतो.

मासिक पाळी येण्यापूर्वी पोटात दुखू लागते, पाय दुखतात, जड होतात, कंबर दुखते, शरीर जाड झाल्यासारखे वाटते. तसंच मासिकपाळीच्या काळात इतर वेळेपेक्षा शरीरातून अधिक गॅस सोडला जातो का ? ही समस्या तुमच्या एकटीची नाही तर अनेक महिलांना हा त्रास होतो. पण तुम्हाला यामागचे नेमके कारण माहित नाही. तर तुमच्या मनातील या प्रश्नावर  Dr Ashish Khiani यांनी उत्तर दिले. मासिकपाळीबद्दल मुलींच्या मनातील ’10′ प्रश्नांवर तज्ञांची खास उत्तरं !!

  • हार्मोनल बदल:

Also Read

More News

हार्मोनचे चक्र चालू होण्यापासून ओव्यूलेशनपर्यंत, या सगळ्यात इस्ट्रोजन हा महत्त्वाचा हार्मोन आहे. तर ओव्यूलेशननंतर progesterone हा हार्मोन महत्त्वाचा ठरतो. मासिकपाळीच्या काळात estrogen आणि progesterone या हार्मोन मधील बदलांमुळे फक्त तुमच्या मूडवर नाही तर  तसंच त्याचा प्रभाव gastrointestinal system वर देखील परिणाम होतो. ओव्हूलेशन शिवाय मासिक पाळी येऊ शकते का ?

अनेकदा स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात डायरियाला सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे progesterone पातळीत झालेला बदल. याउलट progesterone हार्मोन रिलॅक्स झाल्यावर आतड्यांचे स्नायू स्मूथ होतात. परिणामी बद्धकोष्ठता होऊ शकते. त्यामुळे पोटात गॅस होऊ लागतो. Bloating आणि पोटात गॅस वाढण्याच्या समस्येमागील ’10′ कारणं

  • शारीरिक रचना:

तुमचे गर्भाशय आतड्यांच्या समोरच्या बाजूला असल्यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या गर्भाशयाच्या आकुंचनामुळे सातत्याने bowel movements होतात व पोटात गॅसची निर्मिती होते. मासिकपाळीपूर्वी काही दिवस आधी वजन वाढल्यासारखे का वाटते ?

टीप्स:

bowel activity मध्ये होणारे बदल पूर्णतः हेल्दी असतात. मासिक पाळीच्या काळात गॅस सोडताना दुर्गंधी येऊ नये म्हणून तुम्ही काही काळजी घेऊ शकता. यासाठी फायबरयुक्त पदार्थ अधिक खा. पिकलेली फळे, स्टार्च नसलेल्या भाज्या यांचा आहारात समावेश करा. त्यामुळे ब्लॉटिंग होणार नाही. ‘गूळ’ खा आणि मासिकपाळीपूर्वी होणारी चिडचिड कमी करा

तसंच घेतलेले अन्न नीट पचण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि गॅसला बाय म्हणा. साखर आणि रिफाईंड कार्ब्स युक्त पदार्थ खाणे टाळा. कारण यामुळे बॅक्टरीया फर्मेंटेशन आणि Candida सारख्या फंगसच्या वाढीस चालना मिळते. आणि याचा परिणाम म्हणजे गॅस अधिक प्रमाणात होतो. त्याचबरोबर पास्ता, ब्रेड आणि बेक केलेले पदार्थ खाणे टाळा. मासिकपाळीच्या वेदना हमखास दूर करणारे ’10′ नैसर्गिक उपाय !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Stay Tuned to TheHealthSite for the latest scoop updates

Join us on