भारतीय आहारात कार्ब्स अधिक प्रमाणात असतात असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण गव्हाचे पीठ सर्रास वापरले जाते. पराठा चपाती गव्हाच्या पिठाची बनवली जाते. तर साऊथ मध्ये बनणारा vella dosai हा पदार्थ देखील गव्हाच्या पीठापासूनच बनवला जातो. गव्हाचे पीठ हा भारतीय खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा भाग आहे. तसंच ते पौष्टिक मानले जाते. चहा चपाती हा नाश्त्याचा खरंच हेल्दी पर्याय आहे का ? लहानपणापासूनच आपण अनुभवलं असेल की गव्हाच्या चपातीला/पोळीला आपल्या आहारात किती महत्त्व आहे ते. म्हणजे लहानपणी आई डब्याला पोळी-भाजी द्यायची. भूक लागल्यावर तूप-साखर-पोळी किंवा गूळ-पोळी खाल्यावर भर द्यायची. बिस्कीट किंवा इतर पदार्थ खाण्यापेक्षा गव्हाच्या पिठाचे लाडू करून द्यायची. परंतु मैद्याचे पदार्थ