Advertisement

क्षणात कमी करा पित्ताचा त्रास अन् डोकेदुखी, या टीप्स फॉलो करून उन्हाळ्यात राहा कूल!

डाएट, व्यायामच्या खुळ्या कल्पना बाजुला सारून भारतीय व्यंजनांचा आस्वाद घेऊन आरोग्य कसं जपता येतं...

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Bollywood Actress Kareena Kapoor) अर्थात बेबोचा ‘झिरो फिगर’ लूकमुळे चर्चेत आलेल्या सेलिब्रिटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर ( Celebrity Nutritionist Rujuta Diwekar) यांनी उन्हाळ्यात पित्त आणि डोकेदुखी क्षणात दूर करण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. डाएट (Diet), व्यायामच्या (Exercise) खुळ्या कल्पना बाजुला सारून भारतीय व्यंजनांचा आस्वाद घेऊन आरोग्य कसं जपता येतं, याबाबत देखील ऋजुता यांनी मार्गदर्शन केलं आहे.

विशेष म्हणजे, ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांचे हेल्दी फंडे सोपे असल्यानं ते पाळणे देखील सगळ्यांच्या आवाक्यात आहेत. म्हणूनच महागडे आणि रटाळ जीम आणि डाएट प्लॅन पाळण्यापेक्षा तुमच्या शरीराला समजून घेऊन त्यानुसार तुमच्या आहारात बदल करा. कारण अनेकदा केवळ एखादी व्यक्ती विशिष्ट डाएट फॉलो करते म्हणून त्याचे अनुकरण करणं हे फायद्यांपेक्षा नुकसानकारक जास्त ठरू शकते.

उन्हाळ्याच्या दिवसात भूक मंदावलेली असते. त्यात सध्या लॉकडाऊन आहे. सगळे घरात आहेत. बाहेर ऊन देखील चांगलंच तापत आहे. उष्णतेसोबतच या काळात पचानाचे विकार देखील वाढतात. अपचन, मळमळ, पित्त, उलट्या होणं, डीहायड्रेशन, भोवळ येणं असे अनेक त्रास उद्भवतात. म्हणूनच उन्हाळ्यात वाढणारी डोकेदुखी आणि पित्ताच्या त्रासावर नेमकी कशी मात, करावी याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

- उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी माठाचा वापर करा. तसेच दिवसभरात मुबलक पाणी प्या. मूत्रविसर्जनाच्या वेळेस काही त्रास न होता. त्याचा रंगदेखील अधिक पिवळसर नसेल याची काळजी घ्या. पाण्यामुळे शरीराचे तापमान सुरळीत राहण्यास मदत होते.

- नाश्त्यानंतर आणि दुपारच्या जेवणाआधी कोकम सरबत आणि सब्जाचे मिश्रण मिसळून प्या. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.

- दुपारच्या जेवणात शक्य असल्यास दही भात खाण्याची सवय ठेवा. यामुळे शरीराला प्रोबायोटिक्स मिल मिळेल तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.

-रात्री झोपण्यापूर्वी गुलकंद आणि दूधाचे मिश्रण एकत्र करून प्यावे. दूध हे नैसर्गिकरित्या थंड स्वरूपाचे असल्याने शरिरातील उष्णता कमी करते तसेच शांत झोपण्यास मदत करते.

- उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणात किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यास आंबा खा. मधूमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी देखील कॅलरीजचे गणित सांभाळत आहारात आंब्याचा समावेश अवश्य करू शकतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक आढळते. यामुळे शरीरातील नसा शांत राहतात. तसेच तुम्हांला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत होते.

Stay Tuned to TheHealthSite for the latest scoop updates

Join us on