सण परंपरा आणि त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिवाज्य भाग आहे. परंतु मधुमेह असल्यास ब्लड ग्लुकोज मधील थोडासा बदल देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही मुंबईच्या Wockhardt Hospital चे हेड ऑफ मेडिसिन Dr Behram S. Pardiwalla यांच्याशी संवाद साधला. त्यांनी उपवास करताना ब्लड ग्लुकोज अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास काय करावे आणि ते टाळण्याचे मार्ग कोणते याबाबत मार्गदर्शन केले. तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ? रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावर: औषधे चालू असल्यास मधुमेहींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण उपवासात तुम्ही घेत असलेल्या आहारानुसार डॉक्टर औषधांचे डोस बदलून