PCOS हा महिलांमधील एक इन्डोक्राइन विकार असून त्यामुळे महिलांना वंधत्व येऊ शकते.प्रजनन काळातील ८ ते १० टक्के महिलांमध्ये पीसीओएस ही समस्या आढळते.ब-याचदा महिलांना पीसीओएस ही त्यांच्या वंधत्वा मागची मुळ समस्या आहे हे देखील समजत नाही.अनेक लोकांना असे वाटत असते की पीसीओएस ची समस्या असलेल्या महिलेला गर्भधारणा होणे कठीण असू शकते.खरेतर असे असण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही कारण पीसीओएस या समस्येमुळे स्त्रीच्या हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा येतो. जे हॉर्मोन्स स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी स्त्रीबीज निर्माण करणे व गर्भाशयाला तयार करण्याचे काम करीत असतात.Androgens (testosterone प्रमाणे असणारे एक मेल हॉर्मोन) या हॉर्मोनच्या अति वाढीमुळे व इन्सुलीनच्या पातळीत देखील झालेल्या अति वाढीमुळे स्त्रीच्या मासिक पाळीवर