पाऊस आल्याबरोबर काही आजार घेऊन येतो. असं म्हणण्यापेक्षा आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे पावसाळी आजारांची लागण आपल्याला होते. परंतु स्वच्छता राखण्यास विशेष काळजी घेतल्यास आपण या आजारांपासून सुरक्षित राहू शकतो. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी 10 आयुर्वेदिक टिप्स ! पावसाळ्यात जागोजागी साचलेले पाणी अस्वच्छता यामुळे डास होतात. अगदी छोटा दिसणारा डास पण यामुळे डेंग्यू मलेरिया किंवा चिकनगुनिया यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही केमिकल repellent किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा वापर करू शकता. परंतु कडूलिंब हा डासांना पळवून लावण्याचा नैसर्गिक आणि परिणामकारक उपाय आहे. डासांना पळवून लावा या ’10′ नैसर्गिक उपायांनी ! कडूलिंबाचा कसा उपयोग होतो? डासांना दूर ठेवण्यासाठी कडूलिंब आणि खोबरेल तेलाचे