परफ्युम्स न आवडणाऱ्या व्यक्ती कमीच असतील. वेगवेगळे परफ्युम्स ट्राय करायला अनेकांना आवडते. त्यासाठी आपण भरपूर वेळ आणि पैसे खर्च करतो. पण तो परफ्युम फेक निघाला तर? वेळ आणि पैसे दोन्ही वाया. मग असं वाटतं त्यात थोडे अजून पैसे घातले असते तर ओरिजिनल परफ्युम मिळाला असता. ओरिजिनल परफ्युमचा सुगंध दीर्घ काळ टिकतो. त्यामुळे पैसे वाया गेल्याचे दुःख होत नाही. पण इतक्या सगळ्या परफ्युम्समधून नक्की ओरिजिनल कोणता हे ओळखणे कठीण असते. Perfumebooth.com चे founder and owner रोहित कुमार अग्रवाल यांनी ओरिजिनल परफ्युम ओळखण्यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. ओरिजिनल परफ्युम्सची बॉटल स्मूथ असते तर बनावट परफ्युम्सची बॉटल थोडी रफ आणि दिसायला फारशी सुरेख नसते. काही वेळेस प्लास्टिक