शरीरावरचे अनावश्यक केस काढून टाकणे ही केवळ फॅशन नसून शारीरिक स्वच्छतेचा तो एक भाग आहे.तसेच शरीरावरचे अनावश्यक केस काढून टाकल्यामुळे तुमची त्वचा अधिक आकर्षक देखील दिसू लागते.आजकाल त्वचेवरील हे अनावश्यक केस काढण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनावश्यक केस काढण्याचा काही पद्धती - शेव्हींग- आतापर्यंत शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी रेझर द्वारे केस शेव्ह करणे हेच एक लोकप्रिय तंत्र होते.बाजारामध्ये २ ते ५ ब्लेडचा सेट असलेले रेझर सहज उपलब्ध होतात.ओल्या त्वचेवर हे रेझर फिरवून तुम्ही सहजपणे तुमच्या शरीरावरील केस काढू शकता.केस काढण्यापूर्वी तुम्ही त्वचेवर शेव्हींग जेल लावू शकता.केस ज्या दिशेने वाढतात त्या दिशेने शेव्हींग करावे व नंतर उलट्या दिशेने रेझर फिरवावे ज्यामुळे