Advertisement

केसांची स्टाईल करताना केलेल्या या '४' चुकांमुळे केस गळू लागतात !

केसांचे नुकसान व केसगळती टाळण्यासाठी स्टायलिंग करताना ही काळजी घ्या.

केस विंचरल्यावर डोक्यापेक्षा फणीवर अधिक केस असतात का ? ताण, वय आणि हार्मोनल बदल यामुळे केसगळती होते. तसंच तुम्ही केसांची कोणती स्टाईल करता, त्यासाठी कोणती साधने वापरता यावर देखील केस गळण्याचे प्रमाण अवलंबून आहे. कारण त्यामुळे केसांना हानी पोहचते. म्हणून केसांचे नुकसान टाळण्यासाठी स्टायलिंग करायचीच नाही का? अगदी तसेच नाही. पण स्टायलिंग करताना काही मर्यादा पाळण्यास, विशेष काळजी घेतल्यास केसांचे होणारे नुकसान भरून काढता येईल. ब्युटी आणि हेयर एक्स्पर्ट Janet Fernandez यांनी स्टाईल करताना होणारे केसांचे नुकसान, केसगळती कशी टाळावी, हे सांगितले.

१. हेव्ही हेअर एक्सटेन्शन्स वापरणे: हेव्ही हेअर एक्सटेन्शन्स वापरल्याने डोके जड झाल्यासारखे वाटते. डोक्यावर, केसांवर वजन येते व त्यामुळे केस गळू लागतात. तसंच ६-८ आठवड्यांसाठी एक्सटेन्शन्स हलके असले तरी वापरू नका. कारण त्यामुळे केस तुटू लागतील. हलके एक्सटेन्शन्स वापरा पण जास्त वेळासाठी ते केसांवर ठेऊ नका. त्यामुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !

२. पोनी बांधण्यासाठी इलॅस्टिक रबरबँड वापरणे: इलॅस्टिक रबरबँडने पोनी बांधल्यास केस अगदी सहज तुटतात. रबर काढताना केस तुटू लागतात. म्हणून इलॅस्टिकऐवजी कपड्याचे रबरबँड वापरा. ते केसांतून सहज निघतात व त्यामुळे केस देखील तुटत नाहीत. या कारणांमुळे केस विरळ होण्यावर घरगुती उपाय फायदेशीर ठरत नाहीत !

Also Read

More News

३. स्टायलिंगची विविध साधने वापरणे: काहीजणांना प्रत्येक वेळी बाहेर किंवा पार्टीला जाताना केस ब्लो ड्राय करण्याची सवय असते. केस कर्ल किंवा स्ट्रेट करण्यासाठी स्ट्रेटनेर, आयनिंग मशीन नियमित वापरल्याने केसांचे स्वरूप बिघडते व केस तुटू लागतात. म्हणून केस जितक्या नैसर्गिक स्थितीत ठेवता येतील तितके अधिक चांगले. तसंच गरज असल्यास या साधनांचा वापर केल्यानंतर केसांना तेलाने मालिश करा. त्यामुळे केस खराब होणार नाहीत. एरंडेल तेल – केसांच्या सार्‍या समस्या दूर करणारा रामबाण उपाय !

४. ओले केस ब्लो ड्राय करणे: ओले केस सुकवण्यासाठी ब्लो ड्राय करू नका. कारण त्या उष्णतेमुळे केस खराब होऊ शकतात. तसंच केसांचे नुकसान टाळण्यासाठी ओल्या केसांची कोणतीही स्टाईल करू नका. रात्री ओले केस घेऊन झोपताना या टीप्स नक्की लक्षात ठेवा !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Stay Tuned to TheHealthSite for the latest scoop updates

Join us on