Advertisement

विरळ भुवयांना अधिक खुलवण्यासाठी खास टीप्स

या ३ स्टेप्सने खुलवा भुवयांचे सौंदर्य !

सौंदर्याच्या बाबतीत आजकाल मुली बऱ्याच जागरूक झाल्या आहेत. आयब्रो पासून नखांच्या शेपपर्यंत सगळ्या लहान सहान गोष्टींना त्या महत्त्व देऊ लागल्या आहेत.

लांब आणि जाड पापण्यांमुळे डोळे उठावदार दिसतात तर चेहरा आकर्षक दिसतो. त्याचप्रमाणे जाड व ठळक भुवया चेहऱ्याचे सौंदर्य खुलवतात. परंतु, सगळ्यांच्याच भुवया लांब, ठळक, जाड असतातच असे नाही. पण नाराज होऊ नका. ठळक भुवया मिळवणं तुम्हाला वाटतं तितकं कठीण नाही. यासाठी Marvie Ann Beck Academy च्या ब्युटी एक्स्पर्ट नंदिनी अग्रवाल यांनी काही टीप्स दिल्या. यापैकी तुम्हाला योग्य अशी टीप निवडा आणि काही मिनिटातच भुवयांचे सौंदर्य खुलवा. उठावदार भुवयांसाठी खास '7' नैसर्गिक उपाय !

  • आयब्रो पेन्सिल वापरताना: साधारणपणे आयब्रो पेन्सिल बऱ्याचजणी वापरतात. परंतु, ती योग्य पद्धतीने वापरली न गेल्यास भुवया काहीशा विचित्र दिसू लागतात. म्हणून भुवईच्या आतल्या बाजूने सुरवात करून भुवईच्या शेवटपर्यंत पेन्सिलने एक स्ट्रोक (लाईन) काढा. नंतर भुवईच्या केसांच्या दिशेने म्हणजेच बाहेरच्या दिशेने हळूहळू पेन्सिल फिरवा. पेन्सिलचा रंग भुवईमध्ये व्यवस्थित ब्लेंड होण्यासाठी ब्रो ब्रशचा वापर करा. कसा निवडाल ‘आयब्रो’चा परफेक्ट शेप !
  • Also Read

    More News

  • आयब्रो मस्कारा वापरताना: आयब्रो मस्कारा तुमच्यापैकी बऱ्याचजणींसाठी नवीन असेल म्हणून तो लावताना काळजीपूर्वक लावा. तुम्हाला जर बोल्ड लूक हवा असेल तर आयब्रो मस्कारा वापरा. तुम्ही फक्त आयब्रो मस्कारा वापरू शकता किंवा आयब्रो पेन्सिल लावून झाल्यावर त्याचा वापर करू शकता. आयब्रो मस्कारा लावताना भुवईच्या आतील भागापासून सुरवात करून केसांच्या दिशेने लावत मस्कारा संपूर्ण भुवईला लागेल असे पहा.
  • आयब्रो जेल वापरताना: आयब्रो जेलच्या साहाय्याने तुम्ही तुमचा लूक अधिकाधिक खुलवू शकता. यामुळे तुमच्या भुवईला रंग तर मिळेलच पण त्याचबरोबर आयब्रोचे केस एका जागी नीट राहतील. जेल वापरताना वरच्या दिशेने स्ट्रोक्स द्या. त्यासाठी ब्रशचा वापर करा. यामुळे तुम्हाला परफेक्ट आयब्रोज मिळण्यास मदत होईल.

टीप:

आयब्रो पेन्सिल वापरताना किंवा आयब्रो फील (filling) करताना थोडं ठळकच करा. तुमच्या भुवईच्या केसांच्या रंगानुसार पेन्सिल शेड निवडल्यास आयब्रोज अधिक हार्श दिसतील. म्हणून थोडी लाईट शेड वापरा. म्हणजे ती भुवईत व्यवस्थित ब्लेंड होईल. नक्की वाचा: थ्रेडींगने आयब्रो केल्यानंतर होणारा त्रास दूर करतील या खास टीप्स !

Read this in English

Translated By –Darshana Pawar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Total Wellness is now just a click away.

Follow us on