भारतीय स्वयंपाकघरात वेलचीचा वापर तिखटाच्या आणि गोडाच्या पदार्थांत देखील प्रामुख्याने होतो. पदार्थ स्वादिष्ट बनवण्याबरोबरीबनेच वेलचीत अनेक औषधी गुणधर्मदेखील दडले आहेत. मुखशुद्धीसाठी विड्यातून तसेच विविध पदार्थांतून वापरात असलेली वेलची शरीराचे स्वाथ्य वाढवण्यासाठी आहारातदेखील का वापरावी त्याची ही ‘ 5’ कारणे – पचन सुधारते : रात्रीच्या जेवणानंतर बडीशेपीसोबत वेलचीचे दाणे का खातात ? याचा तुम्ही विचार केला आहे का ? वेलचीमुळे पचनशक्ती सुधारते. तसेच पोटातील जळजळ व दाह कमी करण्यास मदत करते. अपचनामुळे मळमळ होत असल्यास वेलचीच्या सेवनाने दूर होते. आयुर्वेदात केलेल्या वेलचीच्या वर्णनानुसार पोटातील वायू व पचनाचे विकार दूर करण्यास वेलची उपयुक्त आहे. #