अक्रोड: अक्रोड हे ओमेगा ३ फॅट्स, प्रोटिन्स आणि फायबर्सने युक्त असून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. वजन कमी करण्यास, ताण कमी होण्यास आणि केस व त्वचा चांगली राहण्यासाठी याचा फायदा होतो. तसंच मधुमेहाला देखील आळा बसतो. म्हणून त्यातील फायदे मिळवण्यासाठी दिवसभरात २-३ अक्रोड खा.